'सर्वसामान्य जनतेचा विकास म्हणजेच देशाचा खरा विकास' हे ब्रीद मानून समाजाच्या भल्यासाठी अथक झटणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मा. आमदार के. पी. पाटील. समाजातील विविध क्षेत्रात संपूर्ण विकास साधला जावा यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांना वाचा फोडणारा, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना अमलात आणणारा नेता लोकांना 'आपला' नेता वाटतो. आपल्या सर्वसमावेशक व जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या वृत्तीमुळे 'जनसामान्यांचे सशक्त व्यासपीठ' अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
अधिक वाचानागरी विकास आणि दळणवळण एकमेकांना समांतर आहेत आणि यासाठी रस्ते व वाहतूक व्यवस्था उत्तम असणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. या गोष्टी लक्षात घेऊन मा. ना. के. पी. पाटील यांनी भुदरगड, राधानगरी, आजरा यांसारख्या अनेक विभागांमध्ये रस्ता दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम केले आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय व अन्य कारणांसाठी येथील नागरिकांना करावा लागणारा दैनंदिन प्रवास सुकर झाला आहे.
ग्रामीण समाजव्यवस्थेची सहकाराशी रुजलेली नाळ व सामान्य जनेतेचा असलेला विकास डोळ्यासमोर ठेवून मा. के. पी. पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना अनेक प्रकारे मदत केली आहे. सहकारातील संस्था उत्तम प्रकारे चालविण्याचा आदर्श त्यांनी आपल्या नेतृत्वामधून घालून दिला आहे.
बिद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांमध्ये विस्तारले आहे. चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळत असतानाच मा. के. पी. पाटील यांनी कारखान्याच्या प्रत्येक विभागाची, युनिटची, तांत्रिक बाबींची सखोल माहिती घेत, सर्व बाबतीत वैयक्तिक लक्ष देत कारखान्याचा कारभार व कार्यक्षमता उत्तम रखण्यावर भर दिला.
अधिक वाचाजिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण विकासाची शिखरसंस्था म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांना, सामान्य जनतेचा आर्थिक उत्कर्ष व्हावा यासाठी मा. के. पी. पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, सहाय्य मिळवून दिले.
मा. के. पी. पाटील यांच्या निर्धारामुळे सहकाराच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांचे जीवनमान उंचावले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे 'औद्दोगिक विकासाचे नवे पर्व' म्हणून ओळखल्या जाणार्या हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीची स्थापना. या प्रकल्पाचे यश त्यास प्राप्त झालेल्या शासकीय पुरस्कारांमधून स्पष्ट होते.
अधिक वाचाएकूण निधी
राष्ट्रीय पेय जल योजना
अतिरिक्त निधी
अंतर्गत रस्ते सुधार