• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com
KP Patil

समाजकारणातील मा. आमदार के.पी. पाटील

४३ वर्षे समाजकारणात काम करताना मा. आमदार के. पी. पाटील यांनी श्रेयवादाची कधीही स्टंटबाजी केली नाही. काम करत राहणे, कामाचा पाठपुरावा करणे यावर त्यांनी नेहमी विश्र्वास ठेवला. जनता सुजाण आहे, त्यामुळे "विधानसभेसाठी काय पण!" या प्रवृत्तीपेक्षा मतदारसंघातील "सामान्य जनतेसाठी काय पण!" अशी कार्यप्रणाली ठेवण्यात ते यशस्वी झाले. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, आणि मतदारसंघाच्या भल्यासाठी प्रयत्न करणे हे माझे काम आहे हि मा. आमदार के. पी. ची भूमिका मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कारणीभूत ठरली.

मा. आमदार के.पी.पाटील यांनी मतदारसंघात औद्दोगिक विकासाला चालना व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देऊन हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीचा प्रकल्प उभा केला. अनंत अडचणीतून मात करत अत्यंत चिकाटीने, जिद्दीने हा प्रकल्प उभा केला. काही वर्षांपूर्वी हा प्रकल्पच उभा राहणार नाही, अशी टीका टिप्पणी होत असताना हा प्रकल्प यशस्वीरीत्या उभा करून सुरु केला. या सूतगिरणी प्रकल्पात १०० टक्के कामगार मतदारसंघातील आहेत. हा प्रकल्प होताच बिद्री साखरकारखान्याच्या सार्वजनिक जीवनात सहवीज सारखा २० मेगावॅट क्षमेताचा प्रकल्प उभा करून बेरोजगारांना नवी संधी देऊन प्रकल्प यशस्वीरीत्या मार्गावर नेऊन ठेऊन समाजकारणातील आपली ओळख अधोरेखीत केली. विरोधकांनी यावर अनेक टीका, गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले. अशा मुद्दांना छेद देत मा. आमदार पाटील यांनी प्रकल्पातून रोजगार असा समन्वय साधून विकासाला चालना दिली.