• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

राजकारणातील मा. आमदार के. पी. पाटील

४३ वर्षाच्या राजकीय सारीपाटावर राजकारणातल्या अनेक राजकीय लढाया मा. आमदार पाटील यांनी आपल्या मुत्स्दीगीरीने पक्षीय पातळीवर अत्यंत निष्ठेने लढविल्या. यश-अपयश हा त्या लढाईतला भाग असला तरी पक्षनिष्ठेशी मा. आमदार पाटील यांनी कधीही प्रतारणा केली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर पक्षवाढीची व संवर्धनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. २००४ मध्ये विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून गेल्यानंतर कोणत्याही अपेक्षेशिवाय मा.नामदार शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराला आणि निष्ठेला पाठींबा देऊन आपली निष्ठा सिध्द केली. या मतदारसंघात एकदा झालेला मा. आमदार पुन्हा होत नाही हा इतिहास मा. आमदार पाटील यांनी जनाधारावर पुसून टाकला तोही विक्रमी मताधिक्क्याने. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चळवळीतून अनेक कार्यकर्त्यांना मा. आमदार पाटील यांनी संघटन कौशल्याच्या जोरावर संघटन केले. याच ताकदीचा वापर राजकारणातील अनेक संस्थांच्या मध्ये करून संस्था पक्षाकडे ठेवण्यास मा. आमदार पाटील यांचे योगदान मोलाचे ठरले.

KP Patil

बिद्री, भोगवती व आजरा साखरकारखान्यांवर पक्षाचे नेतृत्व फलदायी ठरले आहे. राजकारणात सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून काम केल्याने राजकारण यशस्वी होते हा मूलमंत्र मा. आमदार पाटील यांनी घेऊन राजकारणात आपली ४३ वर्षांची यशस्वी कार्याकीर्द सुरु ठेवली आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा डोळ्यांसमोर ठेऊन मा. आमदार पाटील यांनी मतदारसंघातील सामान्य, उपेक्षित तरुण वर्गातील अनेक कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे देऊन नेतृत्वाची प्रामाणिक झलक सिध्द केली आहे. धर्मनिरपेक्ष राजकारणाचा समन्वय साधत मा. आमदार पाटील जिल्हयाच्या आणि राज्याच्या राजकीय सारीपाटावर दीर्घकाळ नेतृत्वशील आहेत. बिद्रीत गेली ३५ वर्षे तर के.डी.सी.सी. बँकेत २५ वर्षे प्रतिनिधी म्हणून तर या मतदारसंघाचा गेली ९ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. राजकारणाच्या रणांगणावर विकास कामाच्या जोरावर मा. आमदार पाटील हे क्रिकेट वेडया सचिन तेंडूलकर इतके श्रेष्ठ ठरले आहेत.