• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

बिद्री सहकारी साखर कारखाना

चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करताना केवळ 'चेअरमन' म्हणून काम न करता कारखान्याच्या प्रत्येक विभागाची, युनिटची, तांत्रिक बाबींची माहिती घेतल्याने साखर कारखानदारीतला गाढा अभ्यासक 'चेअरमन' म्हणून मा. आमदार पाटील यांची ओळख जिल्ह्याला नव्हे तर राज्याला अधोरेखित झाली. सरासरी रिकव्हरी, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, जास्तीत जास्त उस दर देण्यावर बिद्री नेहमी आघाडीवर राहिली आहे.

बिद्री साखर कारखान्यामध्ये सहवीज प्रकल्पाचा घेतलेला धोरणात्मक निर्णय सहकाराला अधिक दृढ करणारा ठरला आहे. सुमारे २० मेगावॅट क्षमेतेचा हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक तऱ्हेने चांगला चालला आहे. वीज एक्सपोर्ट माध्यमातून कारखान्यात सुमारे २,२२१.१३ लाख उत्पन्न मिळाले आहे.

  • २५ वर्षे साखरकारखान्याचे संचालकपद भूषविले.
  • १० वर्षे साखरकारखान्याचे अध्यक्षपद
  • तोट्यात असलेला उद्दोग नफ्यात आणून अनेक उच्चांक गाठले.
  • आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस दर देणारी संस्था भाव रु. २७००/टन २०१४ या वर्षासाठीचा
  • कारखान्यात २० मेगावॉट वीज उत्पादन केंद्र सुरु करून २०१३ मध्ये २३ कोटी वीजविक्री केली. २०१४ मध्ये हीच वीजविक्री ३० कोटी.
  • मा. शरद पवारांनी पाटील साहेबांच्या या कामाची विशेष नोंद घेऊन त्यांची NHEC Ltd. च्या संचालक पदी नियुक्ती केली.